उरी येथे पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न; एक दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

परवा (रविवार) उरी येथे जवानांनी कारवाईत तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारले होते. या मोहिमेत तीन नागरिक आणि एक जवान जखमी झाले होते. या तीन दहशतवाद्यांबरोबर आणखी काही दहशतवादी या भागात असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर शोधमोहीम सुरु करण्यात आली होती

श्रीनगर - जम्मु काश्‍मीर राज्यातील बारामुल्ला जिल्ह्यामधील ताबारेषेजवळ घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न भारतीय लष्कराने आज (मंगळवार) हाणून पाडला. लष्कराच्या कारवाईत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले.

या ठिकाणी दहशतवाद्याकडून वापरण्यात आलेले शस्त्र आढळून आले आहे. ही कारवाई अद्यापी सुरु असून या प्रकरणी अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

परवा (रविवार) उरी येथे जवानांनी कारवाईत तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारले होते. या मोहिमेत तीन नागरिक आणि एक जवान जखमी झाले होते. या तीन दहशतवाद्यांबरोबर आणखी काही दहशतवादी या भागात असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर शोधमोहीम सुरु करण्यात आली होती. गेल्या वर्षी उरीमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्याप्रमाणेच हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता.

 

Web Title: Jammu And Kashmir: Army Foils Infiltration Bid In Uri, 1 Militant Killed