पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, जवान हुतात्मा

 jammu and kashmir army jawan martyred in pakistan ceasefire violation in sunderbani
jammu and kashmir army jawan martyred in pakistan ceasefire violation in sunderbani

श्रीनगरः पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच असून, जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात भारतीय जवान हुतात्मा झाला आहे.

देशभरात आज (गुरुवार) होळी मोठ्या उत्साहात साजरी होत असताना दुसरीकडे सीमेवर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव कायम आहे. होळीच्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. आज सकाळी सीमा रेषेवर सुंदरबनी सेक्टर येथे पाकिस्तानी सैनीकांनी भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात भारतीय सैन्यातील एक जवान हुतात्मा झाला आहे. यशपाल (वय 24) असे हुतात्मा झालेल्या जवानाचे नाव आहे. दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधील सोपोर येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर ग्रेनेड हल्ला केला. यामध्ये तीन जवान जखमी झाले आहेत. सुरक्षा यंत्रणाचे या परिसरात शोधमोहीम सुरु केली असताना दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली आहे. अजूनही या भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांनी परिसर ताब्यात घेतला असून, शोधमोहिम सुरू आहे.

पाकिस्तानी सैनीकांनी चार दिवसांपूर्वीही सीमा रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यामध्येही भारताचा एक जवान हुतात्मा झाला होता तर तीन जवान जखमी झाले होते. रायफलमन कमरजित सिंग असे या हुतात्मा झालेल्या जवानाचे नाव होते. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ला केला होता. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com