दहशतीच्या मार्गाने काश्मीर मिळविण्याचा प्रयत्न : मुफ्ती

वृत्तसंस्था
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

सरकारने 370 कलम हटविण्याचा घेतलेला निर्णय असंविधानिक आणि कायदेशीर नाही. आजचा दिवस हा भारतीय लोकशाहीतील काळा दिवस आहे. 370 कलम हटवण्याच्या निर्णयाचे वाईट परिणाम होतील. दहशततीच्या मार्गाने सरकारचा काश्मीर मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.  काश्मीरला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे.

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटविण्याची शिफारस केंद्र सरकारने केल्यानंतर जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी  भारताच्या लोकशाहीतील आजचा काळा दिवस असून, दहशतीच्या मार्गाने काश्मीर मिळविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले आहे.

मुफ्ती यांनी ट्विट करत सरकारच्या या निर्णयावर आपले मत व्यक्त केले आहे. मुफ्ती म्हणाल्या, की सरकारने 370 कलम हटविण्याचा घेतलेला निर्णय असंविधानिक आणि कायदेशीर नाही. आजचा दिवस हा भारतीय लोकशाहीतील काळा दिवस आहे. 370 कलम हटवण्याच्या निर्णयाचे वाईट परिणाम होतील. दहशततीच्या मार्गाने सरकारचा काश्मीर मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.  काश्मीरला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. भाजप नेता असूनही वाजपेयींना नेहमीच काश्मिरींबद्दल सहानुभूती होती. त्यांनी काश्मीरमधील नागरिकांचं प्रेम आणि विश्वास मिळवला होता. आज सर्वात जास्त त्यांची कमतरता जाणवत आहे. जे लोक काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीचा आनंद साजरा करत आहेत, त्यांनी जाणीव नाही की भारत सरकारच्या निर्णयाचे दूरगामी परिणाम असतील.

जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याची शिफारसीसह जम्मू काश्मीरचे त्रैविभाजन करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मांडला आहे. त्यामुळे लडाख हा केंद्रशासित प्रदेश होणार आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आज (सोमवार) राज्यसभेत याबाबत प्रस्ताव मांडला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jammu and Kashmir former CM Mehbooba Mufti attacks government