esakal | नापाक हरकती थांबेनात! जम्मूत वेगवेगळ्या ठिकाणी दिसले 4 ड्रोन
sakal

बोलून बातमी शोधा

नापाक हरकती थांबेनात! जम्मूत वेगवेगळ्या ठिकाणी दिसले 4 ड्रोन

जम्मू आणि काश्मीरमध्ये सीमेपलिकडून ड्रोन येण्याच्या घटना कमी होत नसल्याचं दिसत आहे.

नापाक हरकती थांबेनात! जम्मूत वेगवेगळ्या ठिकाणी दिसले 4 ड्रोन

sakal_logo
By
सूरज यादव

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमध्ये सीमेपलिकडून ड्रोन येण्याच्या घटना कमी होत नसल्याचं दिसत आहे. आता आणखी चार संशयास्पद ड्रोन सापडले आहेत. जम्मू आणि सांबा सेक्टरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 4 ड्रोन दिसल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. याआधी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी जम्मू एअरफोर्स स्टेशनचा दौरा केल्यानंतर काही तासातच पुन्हा ड्रोन दिसल्याची घटना घडली होती.

याआधी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ड्रोन दिसले होते. लष्कराच्या जवानांना बुधवारी रात्री 9 वाजता पल्लनवाका सेक्टरमध्ये क्वाडकॉप्टर पाहिलं. जेव्हा सैनिकांनी क्वाडकॉप्टरला पाडण्यासाठी गोळीबार केला तेव्हा ते पाकिस्तानच्या दिशेने परत गेलं. या भागातील माहिती घेण्यासाठी तो ड्रोन पाठवण्यात आला होता.

हेही वाचा: भारतात यायचंय, पण..;चोक्सीचे सुरक्षा यंत्रणांवर गंभीर आरोप

तसंच जम्मूत आंतरराष्ट्रीय सीमेवर मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास एक संशयास्पद ड्रोन दिसला. सीमा सुरक्षा दलाने यावर तात्काळ कारवाई करत 5 ते 6 राउंड फायर केले. त्यानंतर ड्रोन पाकिस्तानच्या दिशेला परतला. बीएसएफच्या सैनिकांना 200 मीटर उंचीवर लाल प्रकाश दिसला होता.

जम्मूतील एअरफोर्सच्या तळावर 27 जूनला ड्रोनने हल्ला झाला होता. या हल्ल्यात एका इमारतीचे नुकसान झाले होते. याशिवाय एक स्फोट मोकळ्या जागेत झाला होता. एनआयएच्या सुरुवातीच्या तपासात अशी माहिती समोर आली होती की, स्फोटके डागणाऱ्या ड्रोनच्या निशाण्यावर लष्कर आणि एअरफोर्सची हेलिकॉप्टर्स होती.

loading image