जम्मू-काश्मीरला 25,000 कोटींचे विकास प्रकल्प देणार : पंतप्रधान

वृत्तसंस्था
शनिवार, 19 मे 2018

''जम्मू आणि काश्मीरला 25,000 कोटींचे विकास प्रकल्प देण्यात येणार आहेत''.

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

जम्मू : जम्मू आणि काश्मीरला 25,000 कोटींचे विकास प्रकल्प देण्यात येणार आहेत, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. तसेच या प्रकल्पामुळे राज्यातील जनतेला याचा चांगला फायदा होणार असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

modi

येथील एका उद्घघाटन कार्यक्रमाप्रसंगी पंतप्रधान बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, जम्मू आणि काश्मीर राज्याला 25,000 कोटींचे विकास प्रकल्प देण्यात येणार आहेत. या विकासप्रकल्पाचा फायदा राज्यातील जनतेला होणार आहे. मंगोलिया येथे भेट देण्याची मला नुकतीच संधी मिळाली. मंगोलियातील जनतेला भारत आणि भारताच्या धोरणाबाबत काहीही माहिती नाही. फक्त त्यांना कुशोक बकुलाजी यांच्याबद्दल माहिती आहे. 

Web Title: Jammu and Kashmir is going to get development projects worth Rs 25000 crore