यूपीएससी टॉपरने 'रेपिस्तान' म्हटल्याने खळबळ

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जुलै 2018

देशात मुलींवर होत असलेल्या बलात्कारांवर भाष्य करणारे ट्विट त्याने केले होते. या ट्विटमध्ये त्याने म्हटले होते, ''पितृसत्ता+ लोकसंख्या+ निरक्षरता+ दारु+ पॉर्न+ तंत्रज्ञान+ अराजकता= रेपिस्तान''

नवी दिल्ली : केद्रींय लोक सेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत जम्मू काश्मीरमधून टॉपर राहिलेल्या शाह फैसल याने 10 जुलै रोजी केलेल्या ट्विटमुळे तो आता चांगलाच अडचणीत आला आहे. 2010 साली झालेल्या लोक सेवा आयोगाच्या परिक्षेत त्याने पहिला क्रमांक पटकावला होता. सध्या तो अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेत आहे. 

देशात मुलींवर होत असलेल्या बलात्कारांवर भाष्य करणारे ट्विट त्याने केले होते. या ट्विटमध्ये त्याने म्हटले होते, ''पितृसत्ता+ लोकसंख्या+ निरक्षरता+ दारु+ पॉर्न+ तंत्रज्ञान+ अराजकता= रेपिस्तान''

मंगळवारी (10 जुलै) केंद्रिय मंत्र्याकडून सरकारला त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर त्याने एका वाहिनीशी बोलताना आपला संताप व्यक्त केला आहे. तो म्हणाला, ''या घटनेनंतर माझी नोकरी जाण्याची शक्यता आहे, तरी मला देशातील जनतेकडून अपेक्षा आहेत.'' भारताच्या बाबतीत हे ट्विट केल्याने त्याला सोशल मिडीयातून ट्रोल करण्यात येत आहे.

Web Title: Jammu and Kashmir govt takes action against 2010 IAS topper Shah Faesal