अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी व्हावी यासाठी कायदा आणणार: मेहबुबा मुफ्ती

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

जम्मु - कठुआ येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचे पडसाद देशभर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जम्मू काश्मीर सरकार अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणा-यांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी नवा कायदा आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दिली आहे.

याबाबत मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विट केले असून, त्यामध्ये त्यांनी ''माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या गुन्ह्यात सामील असलेल्या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यासाठी मी वचनबद्ध आहे''. असे म्हटले आहे.   

तसेच, पीडित चिमुकलीला जे सहन करावे लागले ते इतर कोणत्याही चिमुल्यांना सहन करावे लागू नये. यासाठी अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा मिळावी म्हणून नवा कायदा आणणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

Web Title: jammu And Kashmir To Make Death Penalty Must For Rape Of Minors After Kathua Rape-Murder Case