पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; एक अधिकारी शहीद

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 5 October 2020

पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. 

श्रीनगर- पाकिस्तानी सैन्याकडून सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. सोमवारी पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टमरध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार आणि मोर्टारने गोळे डागण्यात आले. पाकिस्तानने केलेल्या या गोळीबारात भारताचा ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर हुतात्मा झाला. 

संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भीषण गोळीबार केला. याशिवाय मोर्टारने गोळेही डागत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतानेही पाकच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिलं. 

पाकिस्तान सातत्यानं सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. एक ऑक्टोबरलासुद्धा पाकिस्तानच्या सैन्याकडून गोळीबार करण्यात आला होता. लष्कराकडून झालेल्या गोळीबारात हवलदार कुलदीप सिंग आणि रायफलमॅन शुभम शर्मा हुतात्मा झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jammu and Kashmir Pakistan violated ceasefire in Nowshera sector