'लष्कर-ए-तोयबा'च्या दहशतवाद्याला अटक; मोठा शस्त्रसाठा लागला पोलिसांच्या हाती!

वृत्तसंस्था
शनिवार, 4 जानेवारी 2020

काही दिवसांपूर्वी कुल्लन गांदरबल भागात झालेल्या धुमश्चक्रीमध्ये निसार पळून जाण्यात यशस्वी झाला होता.

श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया करणारी संघटना म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या 'लष्कर-ए-तोयबा'च्या कुख्यात दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. श्रीनगर पोलिस आणि सुरक्षा दल (एसएफ)ने शुक्रवारी (ता.3) ही संयुक्त कारवाई केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निसार अहमद डार (वय-23, रा. वहाब पर्रे मोहल्ला) असे या दहशतवाद्याचे नाव आहे. अटक करतेवेळी पोलिसांनी त्याच्याकडील मोठा शस्त्रसाठाही जमा केला आहे. निसार गेल्या काही दिवसांपासून श्रीनगरमध्ये असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सुरक्षा दलाच्या साथीने निसारला ताब्यात घेतले.  

- पोट सुटलंय तर दंड भरा; क्रिकेट बोर्डाची कारवाई

दरम्यान, निसार गेल्या काही वर्षांपासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय झाला होता. स्थानिक पोलिसांनी त्याच्याविरोधात सर्च ऑपरेशनही राबविले होते. नौशेरा सब डिव्हिजनमधील डब्बर क्षेत्रासह आसपासच्या भागात गेल्या तीन दिवसांपासून सर्च ऑपरेशन सुरू होते. अखेर शुक्रवारी पोलिसांना यात यश आले. 

- 'ट्वेंटी20'वर करणार हे चित्रपट राज!

काही दिवसांपूर्वी कुल्लन गांदरबल भागात झालेल्या धुमश्चक्रीमध्ये निसार पळून जाण्यात यशस्वी झाला होता. यावेळी पोलिसांनी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार केले होते. 

- Breaking : इरफान पठाणची क्रिकेटमधून निवृत्ती

दहशतवाद्यांविरोधातील कारवाया सुरू असल्याने पोलिस आणि भारतीय सैन्याच्या जवानांनी स्थानिक नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी 6 वाजता घराबाहेर पडल्यानंतर सायंकाळी 5 वाजेपर्यंत घरी पोहोचण्याची विनंतीही त्यांनी स्थानिकांना केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jammu and Kashmir police arrests LeT terrorist Nisar Dar in Srinagar