लष्करे तैयबाच्या उत्तर प्रदेशातील "एजंट'ला अटक

पीटीआय
सोमवार, 10 जुलै 2017

मुझफ्फरनगर येथील संदीप कुमार उर्फ आदिल आणि दक्षिण काश्‍मीरमधील कुलगाम येथील मुनीब शाह यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांच्या चौकशीमधून एटीएम वा बॅंकांवर दरोडे टाकण्याचे गुन्हेही उघड झाले आहेत. लष्करे तैयबाकडून त्यांचा वापर करुन घेण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे

श्रीनगर - दक्षिण काश्‍मीरमध्ये पोलिस दलाच्या एका अधिकाऱ्यासहित पाच जवानांना ठार करणाऱ्या "लष्करे तैयबा' या कुप्रसिद्ध दहशतवादी संघटनेच्या एका "एजंट'ला अटक करण्यात जम्मु काश्‍मीर पोलिस दलास यश आले आहे. अटक करण्यात आलेला हा दहशतवादी मूळचा उत्तर प्रदेश येथील आहे.

"दक्षिण काश्‍मीरमधील दहशतवादी हल्ल्यासह अन्य गुन्ह्यांच्या मालिकांमध्येही सहभाग असलेल्या एका टोळीस पकडण्यात आम्हाला यश आले आहे. या प्रकरणी मुझफ्फरनगर येथील संदीप कुमार उर्फ आदिल आणि दक्षिण काश्‍मीरमधील कुलगाम येथील मुनीब शाह यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांच्या चौकशीमधून एटीएम वा बॅंकांवर दरोडे टाकण्याचे गुन्हेही उघड झाले आहेत. लष्करे तैयबाकडून त्यांचा वापर करुन घेण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे,'' असे काश्‍मीरचे पोलिस महासंचालक मुनीर खान यांनी सांगितले.

लष्करेचा कमांडर बशीर लष्करी याला गेल्या 1 जुलै रोजी ज्या घरामध्ये यमसदनी धाडण्यात आले; त्याच घरामधून संदीप उर्फ आदिल याला अटक करण्यात आली होती. त्याने दिलेल्या माहितीनुसार शाह यालाही ताब्यात घेण्यात आले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
सरताज अझीझ यांनी माझ्या पत्राची दखलही घेतली नाही: स्वराज
पुणे: चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व मुलाची हत्या​
तांत्रिक कारणामुळे 'एनएसई'वरील व्यवहार बंद
नौगाम सेक्टरमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार
बोट बुडण्यापूर्वी फेसबुकवर केले Live; दोघांचा मृत्यू, 6 बेपत्ता
डेक्कन क्वीनला 1 तास उशीर; प्रवाशांचे आंदोलन
ड्रॅगनची नजर ‘कोंबडीच्या माने’वर​
पुरुषाने दिला मुलीला जन्म​
सिन्नर तालुक्यात शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या​
भूमाफियांमुळे नेवाळी आंदोलनाला हिंसक वळण- आमदार गायकवाड​

मुजोर रिक्षाचालकांविरोधात डोंबिवलीकरांचे 'प्रोटेक्ट अगेन्स्ट रिक्षावाला“
बिल्डर जगदीश वर्मा हत्या प्रकरण; आरोपीची पुराव्याअभावी मुक्तता​
विंडिजकडून भारताचा दारुण पराभव; लुईसचे शतक​

Web Title: Jammu and Kashmir police bust Lashkar module, arrest UP resident