काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात दोन जवान जखमी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याला आज 12 वर्षे पूर्ण होत असतानाच काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. श्रीनगरमध्ये झालेल्या या हल्ल्यात सुऱक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सातत्याने हल्ले केले जातात. गेल्या आठवड्यात मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने यमसदनी धाडले होते. त्यानंतर आता मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याला  आज 12 वर्षे पूर्ण होत असतानाच काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. श्रीनगरमध्ये झालेल्या या हल्ल्यात सुऱक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्रीनगर इथं HMT भागात सुरक्षा दलाच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. हल्ला झालेल्या परिसरात सुरक्षा दलाने शोध मोहिम सुरू केली आहे. या हल्ल्यामद्ये दोन जवान जखमी झाले आहेत. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध परिसरात घेतला जात आहे. 

2008 मध्ये मुंबईवर आजच्याच दिवशी समुद्रमार्गे आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. याला 12 वर्षे पूर्ण होत असतानाच काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. याआधी जम्मूतील नगरोटा भागात असलेल्या टोल नाक्याजवळ 4 दहशतवाद्यांचा सुऱक्षा दलाने खात्मा केला होता. ठार करण्यात आलेले 4 दहशतवादी 26/11 च्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात करण्याच्या तयारीत होते अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jammu and kashmir terrorist attack in HMT area