esakal | CRPF च्या तुकडीवर दहशतवादी हल्ला; पुन्हा पुलवामा घडवण्याचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

srinagar

जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या तुकडीवर पुलवामासारखाच हल्ला करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला. नौगाव इथं सीआरपीएफच्या तुकडीवर हा हल्ला झाला.

CRPF च्या तुकडीवर दहशतवादी हल्ला; पुन्हा पुलवामा घडवण्याचा प्रयत्न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या तुकडीवर पुलवामासारखाच हल्ला करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला. नौगाव इथं सीआरपीएफच्या तुकडीवर हा हल्ला झाला. यानंतर संपुर्ण जिल्ह्यात लष्कराने सुरक्षा वाढवली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवित हानी झाली नसल्याची माहिती मिळाली पोलिसांनी दिली आहे.

काश्मीरमधील दहशतावाद्यांच्या कुरापती अद्याप कमी झालेल्या नाहीत. सोमवारी मध्य काश्मीमधील श्रीनगर जिल्ह्यातल्या नौगाव भागात सीआरपीएफच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. याबाबत काश्मीरच्या आयजींनी सांगितलं की, दहशतवाद्यांनी 110 बटालियनच्या सीआरपीएफ तुकडीवर काही अंतरावरून गोळीबार सुरु केला आणि काही वेळात दहशतवादी पळून गेले. सुदैवाने या हल्ल्यात कोणत्याही प्रकारची जिवित हानी झाली नाही. सध्या संपूर्ण परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, खोऱ्यात लष्कराचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. भारतीय लष्कर सध्या तात्काळ कारवाई करत असल्यानं दहशतवाद्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांत सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन होताना दिसत आहे. 

नौगावमधील सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला करण्यात आला. मात्र दहशतवाद्यांचा कट लष्कराने उधळून लावला. दहशतवाद्यांना लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात असल्यानंच अशा प्रकारच्या कारवाया त्यांच्याकडून केल्या जात आहेत. 

हे वाचा - केंद्रीय मंत्री रामविलास पासवान ICU मध्ये; मुलाने लिहिलं भावनिक पत्र

जम्मू काश्मीरमधील सोपोर इथं रविवारी पोलिसांनी मोठं यश मिळवलं. पोलिसांनी अल बद्र दहशतवादी संघटनेशी संबंधित दोघांसह काही लोकांना अटक केली आहे. याची माहिती रविवारी एका स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. सोपोर पोलिसांनी 22 राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत दोन दहशतवाद्यांना अटक केली.