सीमांकनावरून मुस्लिम देशांची संघटना OIC भडकली; भारताने फटकारले

Arindam Bagchi
Arindam BagchiArindam Bagchi

ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनने (ओआयसी) जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) सीमांकनावर (demarcation) आक्षेप घेतला आहे. ओआयसीकडून सीमांकनाबाबत अनेक ट्विट करण्यात आले होते. ओआयसीच्या सरचिटणीसांनी तर हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. यानंतर भारतानेही इस्लामिक देशांच्या संघटनेला फटकारले की, ओआयसीने कोणत्याही एका देशाच्या इशाऱ्यावर जातीयवादी अजेंडा चालवू नये. भारत पाकिस्तानकडे बोट दाखवत होता.

ओआयसीने भारताच्या अंतर्गत बाबींवर पुन्हा एकदा अनावश्यक टिप्पणी केल्याने आम्हाला आश्चर्य वाटत आहे. यापूर्वीही भारत सरकारने केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरबाबतचे (Jammu and Kashmir) ओआयसीचे वक्तव्य फेटाळून लावले आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले.

Arindam Bagchi
ज्ञानवापीनंतर टिपू सुलतानच्या काळातील मशिदीत पूजेची मागणी

ओआयसीचे सरचिटणीस हिसेन ब्राहिम ताहा म्हणाले होते की, त्यांना जम्मू-काश्मीरची (Jammu and Kashmir) लोकसंख्या बदलण्याची चिंता आहे. हे जम्मू-काश्मीरच्या लोकांच्या हक्कांवर गदा आणणारे आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार तेथील लोकांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. इस्लामिक देशांच्या संघटनेने जम्मू-काश्मीरमधील सीमांकनाबाबत (demarcation) अनावश्यक वक्तव्य केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com