esakal | काश्मीर खोऱ्यात लष्करी जवानांकडून ट्रिपल अ‍ॅटक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Army, Jammu Kashmir

दहशतवादी आणि लष्करी जवान यांच्यात झालेल्या चकमकीत कुलगामच्या निपोरा परिसरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे वृत्त आहे.

काश्मीर खोऱ्यात लष्करी जवानांकडून ट्रिपल अ‍ॅटक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

श्रीनगर : जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) मध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांवर ट्रिपल अ‍ॅटक केला. पुलवामा, कुलगाम आणि अनंतनाग परिसरात दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांना लष्करी जवानांनी चौहू बाजूंनी घेरले होते. त्यानंतर दहशतवादी आणि लष्करी जवान यांच्यात झालेल्या चकमकीत कुलगामच्या निपोरा परिसरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे वृत्त आहे. मागील आठवड्याभरात भारतीय लष्करी जवानांनी जवळपास 20 दहशतवाद्यांना यम सदनी धाडले आहे. लष्करी जवान आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.   

कोरोनाच्या रुग्णावर पहिली यशस्वी शस्त्रक्रिया, भारतीय वंशाच्या डॉक्टरने बजावली प्रमुख भूमिका

काश्मीर खोऱ्यातील विविध भागात दहशतवादी दबा धरुन बसल्याची माहिती लष्करी जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे भारतीय लष्करांनी शोधमोहिम हाती घेतली. पुलवामा येथील गुलाब बाग त्राल, कुलगाममधील निपोरा आणि अनंतबागमधील ललन परिसरात दहशत माजवण्याच्या इराद्यात असलेल्या दहशतवाद्यांना लष्करी जवानांनी चौहू बाजूंनी घेरत त्यांचे मनसूबे उधळून लावण्यात यश मिळवले आहे.  

कोरोनावरील लस पुढच्या सहा महिन्यांत शक्य; संशोधन शेवटच्या टप्प्यात