बुखारींसारखे वागू नका; भाजप आमदाराचा पत्रकारांना सल्ला

वृत्तसंस्था
शनिवार, 23 जून 2018

काश्मीरमध्ये ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्या प्रकरणानंतर तेथील भाजपच्या आमदार लाल सिंह चौधरी यांनी पत्रकारांना शुजात बुखांरीसारखे न वागण्याचा इशारा दिला आहे. पत्रकारांनी पत्रकारिता करताना आपल्या मर्यादा सांभाळल्या पाहिजेत. पत्रकारांनी शुजात बुखारी यांच्यासोबत काय झाले हे ओळखून काम करायला हवे. काश्मीरमधल्या पत्रकारांनी एक प्रकारे चुकीचे वातावरण निर्माण केले होते. त्यामुळे काश्मीरच्या पत्रकारांनी मर्यादेत राहायला हवे, बंधुभाव सांभाळयला हवा.

काश्मीर - काश्मीरमध्ये ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्या प्रकरणानंतर तेथील भाजपच्या आमदार लाल सिंह चौधरी यांनी पत्रकारांना शुजात बुखांरीसारखे न वागण्याचा इशारा दिला आहे. पत्रकारांनी पत्रकारिता करताना आपल्या मर्यादा सांभाळल्या पाहिजेत. पत्रकारांनी शुजात बुखारी यांच्यासोबत काय झाले हे ओळखून काम करायला हवे. काश्मीरमधल्या पत्रकारांनी एक प्रकारे चुकीचे वातावरण निर्माण केले होते. त्यामुळे काश्मीरच्या पत्रकारांनी मर्यादेत राहायला हवे, बंधुभाव सांभाळयला हवा.

चौधरी यांच्या या वक्तव्यानंतर मात्र नव्या वादाला तोंड फुटले आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी यावरुन भाजपवर टीका केली आहे. पत्रकारांना आता भाजप आमदारांकडूनच धमक्या मिळत आहेत असे त्यांनी म्हटले आहे. शुजात बुखारी यांचा मृत्यू हे आता गुंडगिरी करणाऱ्यांसाठी पत्रकारांविरोधातले हत्यार झाले आहे की काय अशीच स्थिती आहे अशा आशयाचे ट्विट ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे.

जम्मू काश्मीरचे ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांची १४ जूनला श्रीनगरमध्ये गोळी मारून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा देशभरातून निषेध झाला. आता भाजपा आमदारांनी या हत्येवरूनच पत्रकारांनी मर्यादा पाळली पाहिजे असे म्हटले आहे. दरम्यान, स्पष्टीकरण देताना माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचे लाल सिंह चौधरी यांनी म्हटले आहे.

Web Title: Jammu Bjp Leader Warns Kashmiri Journalists Of Shujaat Bukhari Type Consequences