काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान; सुरक्षा दलाला यश

Jammu-Kashmir
Jammu-Kashmirfile photo
Summary

जम्मू काश्मीरच्या शोपियातील द्रगाड भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.

जम्मू काश्मीरच्या शोपियातील द्रगाड भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. सुरक्षा दलांकडून परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने कंठस्नान घातले. जम्मू काश्मीर पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. परिसरात सुरक्षा दलाचा फौजफाटा मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला आहे.

दहशतवादी ज्या ठिकाणी लपले आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाचे जवान तिथे पोहोचले. जेव्हा सुरक्षा दलाचे पथक दहशतवाद्यांच्या दिशेने निघाले तेव्हा दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु झाला. याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलानेसुद्धा गोळीबार केला. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. अद्याप काही दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता आहे.

Jammu-Kashmir
Poonch: अंतिम हल्ला, पॅरा कमांडोजनी जंगलात दहशतवाद्यांना घेरलं

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सातत्याने चकमक होत आहे. लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे जम्मूमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर पोहोचले होते. यावेळी त्यांनी नियंत्रण रेषेसह पुढील भागात दौरा केला होता. तसंच सुरक्षा दलांना काही आदेशसुद्धा दिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com