पाकिस्तानकडून शस्त्रसंधी भंग सुरूच; तोडीस तोड प्रत्युत्तर

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 जुलै 2017

जम्मू: पाकिस्तानी सैन्याने आज राजौरी आणि पूँच भागात पुन्हा शस्त्रसंधीचा भंग केला. या जिल्ह्यांमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार अणि तोफगोळ्यांचा मारा केला. भारतीय जवानांनी त्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिले.

जम्मू: पाकिस्तानी सैन्याने आज राजौरी आणि पूँच भागात पुन्हा शस्त्रसंधीचा भंग केला. या जिल्ह्यांमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार अणि तोफगोळ्यांचा मारा केला. भारतीय जवानांनी त्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिले.

संरक्षण मंत्रालयातील प्रवक्‍त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैनिकांनी सकाळी साडेसहाच्या सुमारास राजौरीतील भिमभेर गली आणि पूँच सेक्‍टरमध्ये जोरदार गोळीबार सुरू केला. तोफगोळ्यांचाही जोरदार मारा करण्यात आला. पाकिस्तानच्या या माऱ्यामुळे राजौरी ते पूँच या पट्ट्यातील तीन ते चार गावांमधील घरांची पडझड झाली. भारतीय लष्कराने या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच, सीमारेषेवरील गावातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. राजौरीतील नौशेरा भागात पाकिस्तान्या गोळीबारामुळे दोन शाळांमधील मुले अडकून पडल्याने त्यांना सोडविण्यासाठी प्रशासनाला बुलेटप्रुफ गाडी पाठवावी लागली. पाकिस्तानने काल (ता.17) केलेल्या गोळीबारात एक जवान हुतात्मा, तर नऊ वर्षांच्या एका मुलीचा मृत्यू झाला होता.

एका घुसखोराचा खातमा
श्रीनगर : काश्‍मीरमधील गुरेझ सेक्‍टर येथे नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी आज उधळून लावला. या वेळी झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्यालाही ठार मारण्यात आले. या घटनेनंतर तातडीने शोधमोहीम राबविली जात आहे.

Web Title: jammu-kashmir india pakistan firing both side