दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत : ले. जन. भट

पीटीआय
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

सीमेपलीकडे अनेक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत आहेत. बर्फ वितळत असल्याने घुसखोरी लवकरच सुरू होण्याचा अंदाज आहे. मात्र, आम्ही तयारीत आहोत. पाकिस्तानकडूनही गोळीबाराचे प्रकार वाढत आहेत. पाकिस्तानकडून शस्त्रसंधी भंग म्हणजे दहशतवाद्यांना घुसविण्याचा प्रयत्न असल्याचे अनेक वेळा सिद्ध झाले आहे

श्रीनगर - काश्‍मीरमध्ये घुसण्यासाठी नियंत्रण रेषेपलीकडे पाकिस्तानात मोठ्या संख्येने दहशतवादी तयारीत असल्याचा दावा श्रीनगरमधील चिनार तुकडीचे प्रमुख अधिकारी लेफ्टनंट जनरल ए. के. भट यांनी आज केला. पाकिस्तानकडून वारंवार होत असलेले शस्त्रसंधी भंगाच्या घटना म्हणजे दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याचेच प्रयत्न आहेत, असेही त्यांनी सांगितले.

"सीमेपलीकडे अनेक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत आहेत. बर्फ वितळत असल्याने घुसखोरी लवकरच सुरू होण्याचा अंदाज आहे. मात्र, आम्ही तयारीत आहोत. पाकिस्तानकडूनही गोळीबाराचे प्रकार वाढत आहेत. पाकिस्तानकडून शस्त्रसंधी भंग म्हणजे दहशतवाद्यांना घुसविण्याचा प्रयत्न असल्याचे अनेक वेळा सिद्ध झाले आहे,'' असे भट म्हणाले. तीस ते चाळीस दहशतवाद्यांचे अनेक गट नियंत्रणरेषेवर ठिकठिकाणी दबा धरून बसले असल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: jammu kashmir indian army terrorism