सुरक्षा दल-आंदोलक यांच्यातील चकमकीत एक नागरिक ठार

वृत्तसंस्था
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

श्रीनगर: जम्मू काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि आंदोलक यांच्यात झालेल्या चकमकीच्या वेळी एक नागरिक मरण पावला. आज सकाळी येथे सुरक्षा दलांनी लष्कर ए तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना ठार केले.

गुलजार अहमद मीर असे मरण पावलेल्या नागरिकाचे नाव असून तो सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीच्या वेळी मध्ये आल्याचा दावा सुरक्षा दलांनी केला आहे. मात्र, आंदोलकांविरुद्ध सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत मीर मरण पावल्याचे काही जणांनी सांगितले.

जम्मू- काश्‍मीरच्या लिटर भागात सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना यमसदनी पाठविले. त्यात लष्करचा कमांडर वासीम शाह याचाही समावेश आहे. या चकमकीनंतर नागरिकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यास सुरवात केली, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत मीरसह अन्य सहा जण जखमी झाल्याचा दावा त्याने केला. जखमी अवस्थेत मीरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये जखमी झालेल्या चार जणांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: jammu-kashmir news A civilian killed in an encounter between security forces and protesters