उपअधीक्षक खून प्रकरणी पोलिसांकडून 'एसआयटी' स्थापन

वृत्तसंस्था
रविवार, 25 जून 2017

बारा संशयितांना अटक; पाच जणांची ओळख पटली

श्रीनगर: येथे जामिया मशिदीबाहेर पोलिस उपअधीक्षक महंमद अयूब पंडित यांचा माथेफिरू जमावाकडून झालेल्या खूनप्रकरणाच्या चौकशीसाठी जम्मू- काश्‍मीर पोलिसांनी आज विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी आतापर्यंत बारा जणांना अटक करण्यात आली असून त्यातील पाच जणांची ओळख पटली आहे. अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे या समितीची सर्व सूत्रे सोपविण्यात येतील.

या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असून, भविष्यामध्ये आणखी काही संशयितांना अटक होऊ शकते, असे पोलिस महासंचालक एस. पी. वैद यांनी सांगितले. ज्या लोकांनी या हिंसाचारास चिथावणी देण्याचे काम केले त्यांनाही मोकळे सोडले जाणार नाही. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच सत्य बाहेर येईल, असेही त्यांनी नमूद केले.

फारूख मशिदीत उपस्थित
माथेफिरू जमावाकडून पंडित यांची हत्या होत असताना हुर्रियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मिरवाईज उमर फारूख हे मशिदीतच उपस्थित होते, अशी माहिती उघड झाली असून पोलिसांनी मात्र या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगत यावर अधिक स्पष्टीकरण देणे टाळले. ज्या भागामध्ये पंडित यांचा खून करण्यात आला तेथील वरिष्ठ अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

यासिन मलिक ताब्यात
"जम्मू काश्‍मीर लिबरेशन फ्रंट'चे अध्यक्ष महंमद यासिन मलिक यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले. मैसुमाजवळील लाल चौकामध्ये असलेल्या त्यांच्या घरावर पोलिसांनी आज छापा घातला. आगामी रमजान ईदच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मलिक यांना श्रीनगरमधील मध्यवर्ती तुरुंगामध्ये हलविण्यात आले आहे.

Web Title: jammu-kashmir news DSP Mohammad Abdullah Pandith case