कुपवाडामध्ये दोन दहशतवाद्यांना मारण्यात यश

वृत्तसंस्था
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

श्रीनगर: भारतीय लष्कराच्या जवानांनी कुपवाडामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. या वेळी झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारले.

कुपवाडा जिल्ह्याच्या माचिल सेक्‍टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ ही घटना घडली. येथे काही जणांच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्यावर जवानांनी त्यांना हटकले. यामुळे दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. सावध असलेल्या जवानांनी तातडीने प्रत्युत्तर देत दोघा जणांना मारले, तर उर्वरित पळून गेले. जवानांनी दहशतवाद्यांकडून शस्त्रे जप्त केली असून, या भागात शोधमोहीम सुरू केली आहे.

दरम्यान, पाकिस्तानी सैनिकांनी जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार करत शस्त्रसंधीचा भंग केला. काल (ता. 15) मध्यरात्रीपासून पाकिस्तानच्या सैनिकांनी अर्णिया येथील सीमा सुरक्षा दलाच्या ठाण्यावर गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला. यामध्ये एक जवान जखमी झाला असून, निवासी भागातील काही घरांचेही नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून येथे पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा भंग होत आहे.

शव विटंबनेची दखल
दहशतवाद्यांच्या शवांची भारतीय जवानांकडून विटंबना होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने लष्कराने याची दखल घेतली आहे. अबू इस्माईल आणि अबू कासिम हे लष्करे तैयबाचे दोन दहशतवादी नौगाम येथे गुरुवारी (ता. 14) चकमकीत मारले गेले होते. या दहशतवाद्यांच्या शवांची विटंबना जवानांकडून होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. या कृत्याची चौकशी होऊन यामध्ये सत्यता आढळल्यास कारवाई करणार असल्याचे लष्करातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: jammu-kashmir news Kupwara kills two terrorists