'लष्करे तैयबा'चा गट पोलिसांच्या जाळ्यात

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 जुलै 2017

उत्तर प्रदेशातील एकासह दोघांना काश्‍मिरात अटक

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी आज मोठी कारवाई करत लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेचे कारस्थान उधळून लावत दोघांना अटक केली. यापैकी एक जण उत्तर प्रदेशचा असून, दक्षिण काश्‍मीरमध्ये झालेल्या सहा पोलिसांच्या हत्येत त्याचा सहभाग होता.

उत्तर प्रदेशातील एकासह दोघांना काश्‍मिरात अटक

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी आज मोठी कारवाई करत लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेचे कारस्थान उधळून लावत दोघांना अटक केली. यापैकी एक जण उत्तर प्रदेशचा असून, दक्षिण काश्‍मीरमध्ये झालेल्या सहा पोलिसांच्या हत्येत त्याचा सहभाग होता.

संदीपकुमार शर्मा ऊर्फ आदिल (रा. मुझफ्फरपूर) आणि मुनीब शाह (कुलगाम) अशी अटक केलल्या दोघांची नावे आहेत. या दोघांना दहशतवादी कारवाया केल्याच्या आरोपाखाली अटक केल्याचे काश्‍मीरचे पोलिस महानिरीक्षक मुनीर खान यांनी पत्रकारांना सांगितले. संदीपकुमार हा स्थानिक नसल्याचा फायदा घेत लष्करे तैयबाने त्याचा अनेक वेळा वापर करून घेतला. यामुळे गुन्हेगारी आणि दहशतवाद यांच्यातील रेषा पुसट होत असल्याचेही मुनीर खान यांनी सांगितले.

दहशतवादाबाबतच्या तपासातून अनेक नव्या गोष्टीही पुढे आल्या आहेत. अनेक गुन्हेगारांना हाताशी धरून दहशतवादी संघटना त्यांच्याकडून दहशतवादी कारवाया करून घेत आहेत. तसेच, त्यांच्याकडून बॅंकांवर दरोडे घालणे, एटीएम फोडणे अशी कामे करवून घेत निधी मिळवत आहेत, असे तपास यंत्रणांना लक्षात आले आहे. लष्करे तैयबाचा म्होरक्‍या बाशीर लष्करी याला एक जुलैला ज्या घरात मारण्यात आले त्याच घरातून आज संदीपकुमारला अटक करण्यात आली. या घरात एक बाहेरील राज्यातील व्यक्ती राहत असल्याने संशय आल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. त्याने दिलेल्या माहितीवरून मुनीब शाहला अटक करणे सोपे गेले. या घटनेनंतर पोलिसांनी स्थानिक गुन्हेगारांचा दहशतवादी कारवायांमधील सहभाग किती असेल, याबाबत चाचपणी करण्यास सुरवात केली आहे.

गुन्हेगारी ते दहशतवाद
संदीपकुमार हा 2012 पासून काश्‍मीरमध्ये राहत होता. उन्हाळ्यामध्ये वेल्डिंगची कामे करून तो हिवाळ्यात पतियाळामध्ये जात असे. येथे त्याची कुलगामचा मूळ रहिवासी असलेल्या शाहिद अहमदशी गाठ पडली. यानंतर शाहिद अहमद, संदीपकुमार, मुनीब शाह आणि मुझफ्फर अहमद हे चौघे काश्‍मीरमध्ये दरोडे टाकू लागले. त्याला एकदा चोरीबद्दल अटक होऊन जामीनावर सुटकाही झाली होती. याचदरम्यान त्यांची शाकूर अहमद या "लष्करे'च्या दहशतवाद्याशी ओळख झाली. या चौघांनी लुटलेल्या पैशाचा काही वाटा "लष्करे'ला मिळू लागला. यानंतर संदीपकुमार दहशतवादी कारवायांमध्येही सामील झाला. गेल्या महिन्यात 16 जूनला पोलिस पथकावर झालेल्या हल्ल्यात आणि तीन जूनला लष्कराच्या गस्ती पथकावर झालेल्या हल्ल्यात त्याचा थेट सहभाग होता.

Web Title: jammu-kashmir news lashkar e taiba terrorist arrested