दहशतवादी संदीप शर्मा प्रेमामुळे झाला होता मुस्लिम

LeT man Sandeep Sharma
LeT man Sandeep Sharma

नवी दिल्लीः लष्करे तैयबाचा दहशतवादी असल्याच्या आरोपावरून संदीपकुमार शर्मा ऊर्फ आदिल याला जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी अट केल्यानंतर त्याचा विविध कटांमधील सहभाग उघड होऊ लागला आहे. काश्‍मीरमधील मुस्लिम युवतीच्या प्रेमात पडल्यानंतर त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी दहशतवादी संदीप शर्मा याला गेल्या आठवड्यात अटक केली आहे. संदीप हा 2012 पासून घरातून निघून गेला होता. जम्मूत तो नोकरी करत असल्याचे त्याने कुटुंबाला सांगितले होते. तर त्याचा भाऊ हरिद्वार येथे टॅक्‍सीचालक आहे. संदीप हा नोकरी करत असताना काश्‍मीरी मुस्लिम युवतीच्या प्रेमात पडला होता. तिचे वडिल पोलिस उप-निरीक्षक पदावरून निवृत्त झाले आहेत. दोघांच्या विवाहाला युवतीच्या कुटुंबियांचा विरोध होता. यामुळे संदीप याने स्थानिक मशिदीमध्ये मुस्लिम धर्म स्विकारला. धर्मांतरानंतर संदीपकुमार शर्माचा आदिल झाला होता. यानंतर तिच्या कुटुंबियांनी विवाहाला परवानगी दिली होती. विवाहावेळी मोजकेच नागरिक उपस्थित होते. विवाहानंतर तो अनंतनाग व पुलवामा भागात वेल्डिंगची कामे करत होता. दिवसाला त्याला 300 रुपये मिळत होते. यादरम्यान त्याची लष्करे तोयबाच्या शकूरशी ओळख झाली. यानंतर तो दहशतवादी संघटनेमध्ये ओढला गेला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जम्मू-काश्‍मीर पोलिस महानिरीक्षक मुनीर खान म्हणाले की, गेल्या 28 वर्षात काश्‍मीरच्या बाहेरील एखादा व्यक्ती काश्‍मीरमधील दहशतवादी कारवायांत सहभागी असल्याचे प्रथमच उघड झाले आहे. 16 जून रोजी दक्षिण काश्‍मीरमध्ये एका हल्ल्यात सहा पोलिसांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी संदीपसमवेत आणखी एका दहशतवाद्यावर कारवाई केली आहे. हे दोघेही लष्करे तैयबाच्या आदेशावर काम करत होते.

संदीपची आई पार्वती शर्मा म्हणाल्या, 'जर माझा मुलगा दहशतवादी असेल तर त्याला नक्कीच शिक्षा व्हायला हवी. त्याच्या वर्तनामुळे आम्हाला अनेक ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागत असून, लाजिरवाणे जीवन जगावे लागत आहे.' पार्वती या घरगुती कामे करून उदरनिर्वाह करतात. माझा भाऊ जर दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असेल तर त्याला शिक्षा द्या, असे संदीपच्या भावानेही म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com