गिलानींच्या जावयासह सात जणांना अटक

वृत्तसंस्था
सोमवार, 24 जुलै 2017

दहशतवाद्यांना निधी पुरविल्याचा "एनआयए'चा आरोप

श्रीनगर/नवी दिल्ली: दहशतवाद्यांना निधी पुरविल्याप्रकरणी आणि काश्‍मीर खोऱ्यात देशविघातक कारवाया केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) आज सात जणांना अटक केली. फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचा जावाई अल्ताफ अहमद शाह याचा अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे.

अल्ताफ फंटूश या नावाने प्रसिद्ध असलेला शाह हा जम्मू-काश्‍मीर पोलिसांच्याच ताब्यात होता. रमजान ईदनंतर नागरी सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्याच्यासह गिलानी यांचा जवळचे सहकारी आणि तेहरीके हुरियत संघटनेचे प्रवक्ते अयाझ अकबर आणि पीर सैफुल्ला यांनाही "एनआयए'ने अटक केली. याशिवाय शाहिद उल इस्लाम, मेहराजउद्दीन कलवाल, नईम खान आणि फारुख अहमद दार ऊर्फ बिट्टा कराटे अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. या सर्वांच्या घरांवर "एनआयए'ने गेल्या महिन्यात छापे घातले होते. या प्रकरणी पाकिस्तानस्थित जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याचेही नाव "एफआयआर'मध्ये नमूद करण्यात आले आहे.
दहशतवाद्यांना निधी देणाऱ्यांचे जाळे नष्ट करण्यासाठी "एनआयए'ने मोहीम हाती घेतली असून त्याअंतर्गत विविध ठिकाणी छापे घालण्यात येत आहेत. या छाप्यांमध्ये आतापर्यंत दोन कोटी रुपयांची रोख रक्कम आणि बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांचे लेटरहेड हाती आले आहेत. दहशतवाद्यांना निधी पुरविणे, सुरक्षा दलांवर दगडफेक करणे, शाळा जाळणे आणि सरकारी संस्थांवर हल्ले करणे यामागे असणाऱ्या साखळीचाही शोध "एनआयए'तर्फे घेतला जात आहे.

Web Title: jammu-kashmir news seven arreested in kashmir say nia