डोडामध्ये ढगफुटीत सहा ठार; अकरा जखमी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 जुलै 2017

बदरवाह/जम्मू: जम्मू- काश्‍मीरच्या डोडा जिल्ह्यातील थातरी शहरामध्ये आज झालेल्या ढगफुटीत सहा जण ठार झाले असून, अन्य 11 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चार कुटुंबांचा समावेश आहे. बातोते ते किश्‍तवाड राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या परिसराला या ढगफुटीचा मोठा फटका बसला असून अनेक घरेही यामुळे उद्‌ध्वस्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा अकरा जणांना ढिगाऱ्यांखालून बाहेर काढण्यात यंत्रणांना यश आले होते, आणखी काही जण या ढिगाऱ्याखाली अडकले असावेत, अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. या ढगफुटीमध्ये सहा घरे, दोन दुकाने आणि एका शाळेचेही नुकसान झाले आहे.

आज मध्यरात्री दोनच्या सुमारास थाथ्रीमध्ये ही ढगफुटी झाली, यामुळे ओढे, नाले भरून वाहू लागले, या नाल्यांमधील पाणी शहरातील मुख्य बाजारपेठेमध्येही शिरले. या ढगफुटींमध्ये जखमी झालेल्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. स्थानिक प्रशासन, पोलिस आणि लष्कराचे अधिकारी येथील बचाव मोहिमेत सहभागी झाले आहेत. शेजारील परिसरामधील गाळ रस्त्यावर वाहून आल्याने बातोते-डोडा- किश्‍तवाड या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांचे मदतीचे आदेश
डोडा जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीमुळे मरण पावलेल्यांबाबत जम्मू- काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दु:ख व्यक्त केले असून, पीडितांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. पीडितांना निवारा, अन्नधान्य आणि अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: jammu-kashmir news Six people killed in cloudburst