दहशतवादाचे कंबरडे मोडण्यात लष्कराला यश

file photo
file photo

जनरल बी. एस. राजू यांची माहिती

अवंतीपुरा (जम्मू-काश्‍मीर): काश्‍मीरमधील सशस्त्र दहशतवादाचे कंबरडे मोडण्यात लष्कराला यश आले असून, आता दशकांपासून जुन्या फुटीरतावादी समस्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राजकीय दूरदृष्टीची आवश्‍यकता असल्याचे दहशतवादाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या दक्षिण काश्‍मीरमधील लष्कराच्या कमांडरने म्हटले आहे.

दक्षिण काश्‍मीरच्या पाच जिल्ह्यांत दहशतवादाच्या विरोधात मोहीम चालविणारे व्हिक्‍टर फोर्सचे प्रमुख मेजर जनरल बी. एस. राजू यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, की आता असा कोणताही भाग नाही, जिथे दहशतवादी किंवा फुटीरतवाद्यांचा प्रभाव आहे. दहशतवाद्यांनी आता बचावाचा पवित्रा धारण केला आहे. यापुढे दहशतवादी संघटनांमध्ये नवी कोणतीही भरती होऊ नये आणि लष्कर याठिकाणी त्यांच्या मदतीसाठी असल्याचा विश्‍वास लोकांमध्ये निर्माण करण्यावर आता आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. या कामासाठी आमच्या जवानांनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम सुरू केले आहेत.

श्रीनगरपासून 33 किलोमीटर अंतरावर असलेल्या अवंतीपुरास्थित व्हिक्‍टर फोर्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ राजू यांनी सांगितले, की अधिकांश लोकांना शांतता हवी आहे आणि ही सर्वांत मोठी गोष्ट आहे. हिंसाचाराच्या दुष्ट चक्रातून बाहेर पडण्याची त्यांनी इच्छा आहे.

दक्षिण काश्‍मीरला जम्मू-काश्‍मीरमधील दहशतवादाचे केंद्र मानले जाते आणि गेल्या वर्षी याठिकाणी सुरक्षा दलांवर हल्ल्याच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. यावर्षी चित्र बदलले आहे आणि एकट्या या भागातच आतापर्यंत 73 दहशतवाद्यांचा खातमा करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा जवळपास दुप्पट आहे. सुमारे 120 किंवा जास्तीत जास्त 150 सशस्त्र दहशतवादी कार्यरत असल्याचे मानले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com