भारतात घुसखोरी करणाऱ्यास अटक

वृत्तसंस्था
सोमवार, 26 जून 2017

जम्मू: पाकिस्तानमध्ये शस्त्रांचे प्रशिक्षण घेऊन भारतात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यास पोलिसांनी सोमवारी अटक केली.

जम्मू: पाकिस्तानमध्ये शस्त्रांचे प्रशिक्षण घेऊन भारतात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यास पोलिसांनी सोमवारी अटक केली.

राजौरी जिल्ह्यातील बुधाल येथे राहणारा निसार शाह याने 1999 ताबा रेषा ओलांडून पाकिस्तानमध्ये प्रवेश केला होता. तेथे पाकिस्तानच्या ताब्यातील काश्‍मीरमधील दहशतवादी प्रशिक्षणात तो सहभागी झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या दरम्यान आजारी पडल्याने त्याला तेथील कोटली रुग्णालयात दाखल करण्यात आले. कालांतराने प्रशिक्षण सोडून तो कपड्याच्या दुकानात काम करू लागला. यानंतर कोटलीतील औषधांच्या दुकानातही त्याने काम केले. या वेळी दुबईला जाण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीच्या संपर्कात निसार आला. दुबईत त्याचे 2010 ते 2013 या कालावधीत वास्तव्य होते. व्हिसाची मुदत संपल्यावर तो पाकव्याप्त काश्‍मीरला परतला. नेपाळमधील पर्यटक व्हिसा बनवून त्याने तेथून भारतात प्रवेश केला. रविवारी (ता.25) तो राजौरीतील त्याच्या गावी पोचला तेव्हा त्याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

. . . . . .

Web Title: jammu-kashmir news terrorist arrested