जम्मू-काश्मीरमध्ये रात्रीच्या अंधारात मोहीम फत्ते

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

पुलवामा: भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत मारला गेलेला अबू दाजुना हा लष्करे तैयबाचा काश्‍मीरमधील प्रमुख होता. "ए' कॅटॅगरीमध्ये गणला गेलेला हा मोस्ट वॉंटेड दहशतवादी होता. तो तब्बल बारा वेळा पोलिसांच्या तावडीत येता येता बचावला होता. अनेक वर्षांपासून सुरक्षा दले याच्या मागावर असल्याने काल (ता. 1) मध्यरात्री त्याच्याबाबत अत्यंत विश्‍वसनीय माहिती मिळाल्यानंतर लष्कराने एक क्षणही न दवडता कारवाईला सुरवात केली.

अबू दाजुनाबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या विशेष मोहीम पथकाचे जवान तातडीने पुलवामामधील हाक्रीपोरा भागाकडे रवाना झाले. हा भाग लष्करे तैयबाचा प्रभाव असलेल्या नेवा भागाजवळच आहे. दक्षिण काश्‍मीरचे उपमहानिरीक्षक स्वयंप्रकाश पानी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मोहिमेवर देखरेख केली. विशेष पथकाला पुलवामा पोलिस, लष्कराच्या व्हिक्‍टर फोर्सचे जवान आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या दोन बटालियन्सनी सहकार्य करत दुजाना आणि त्याचा साथीदार लपून बसलेल्या भागाला पूर्ण वेढा घातला. दुजाना लपून बसलेले घर भरवस्तीत असल्याने या भागातील इतर नागरिकांना बाहेर काढणे हे लष्कराचे पहिले काम होते. ते झाल्यानंतर दुजाना ज्या घरात लपला आहे, त्या घरातील नागरिकांना बाहेर काढण्याचे काम होते. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू करताच जवानांनी घरामध्ये प्रवेश केला आणि प्रथम नागरिकांना घराबाहेर काढले. यानंतर झालेल्या चकमकीत दुजाना आणि त्याचा साथीदार मारला गेला. मध्यरात्री सुरू झालेली ही मोहीम सकाळी साडेसहा वाजता संपली.

Web Title: jammu-kashmir news Top Lashkar terrorist Abu Dujana and soldier