जम्मू-काश्‍मीरमधील युवक लष्करात दाखल

वृत्तसंस्था
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

श्रीनगर: जम्मू-काश्‍मीर म्हटले की दहशतवाद डोळ्यांसमोर येतो. पण सतत अस्थिर वातावरणातील युवक दहशतवादाची वाट सोडून देशसेवेसाठी लष्करात भरती होत आहेत, याचे प्रत्यंतर मंगळवारी आले. वर्षभराच्या खडतर प्रशिक्षणानंतर राज्यातील 180 जवानांचा आज लष्करात समावेश करण्यात आला.

जम्मू आणि काश्‍मीर लाइट इंफ्रंटीच्या (जेएकेएलआय) बाना सिंग परेड ग्राउंडवर आज झालेल्या दीक्षान्त संचलन समारंभात राज्यभरातून 180 जवान सहभागी झाले होते. हा कार्यक्रम पाहण्यासाठी संबंधित जवानांच्या पालकांसह एक हजार नातेवाईक उपस्थित होते. "जेएकेएलआय' रेजिमेंटचे कर्नल व "इंटिग्रेटेड डीफेन्स स्टाफ' ले. जनरल सतीश दुआ यांनी या संचलनाची पाहणी केली, असे लष्करी प्रवक्‍त्याने सांगितले. नागरी प्रशासन आणि लष्करातील मान्यवरही या वेळी उपस्थित होते.

जम्मू-काश्‍मीरमधील विविध भागांतून विविध धर्मांतील युवक देशाकार्यासाठी आपले जीवन समर्पित करण्याच्या एकाच ध्येयाने लष्करात दाखल झाले. संचलनात त्यांच्या रजिमेंटच्या "बलिदानम वीर लक्ष्यनम' या गीताचा कवायत मैदानात घुमणारा सूर आणि राष्ट्रगीताच्या साथीने त्यांनी तिरंग्याला ठोकलेला सलाम यामुळे सर्वजण देशभक्तीने भारावून गेले होते. ले. जनरल दुआ यांनी या युवा जवानांचे अभिनंदन केले. जम्मू-काश्‍मीरमधील जास्तीत जास्त युवकांनी लष्करी सेवेत यावे यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी केले. देशसेवेच्या या कार्यात सहभागी होण्यासाठी पालकांचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरते, असेही ते म्हणाले.

Web Title: jammu-kashmir news youth join army