पुलवामात दहशतवाद्यांच्या स्फोटात दोन जवान हुतात्मा

Pulwama
Pulwama

श्रीनगर : पुलवामा जिल्ह्यात सोमवारी लष्कराच्या पथकाजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या 'आयईडी'च्या स्फोटात जखमी झालेल्या नऊ जवानांपैकी दोन जवान आज (मंगळवार) हुतात्मा झाले.

दहशतवाद्यांनी केलेल्या स्फोटात नऊ जवान आणि दोन नागरिक जखमी झाले होते. 'कॅस्पर' या वाहनाला हे स्फोटक लावण्यात आले होते. 44 राष्ट्रीय रायफल्सचे जवान अरिहाल-पुलवामा रस्त्यावरील गस्तीवर असताना त्यांच्या वाहनात हा स्फोट घडविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. स्फोट होताच जवानांनी त्वरित गोळीबार सुरू केल्याने दहशतवादी पळून गेले होते. 

स्फोटानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होती, त्यातील दोघांची प्रकृती गंभीर होती. आज सकाळी उपचारादरम्यान यांचा मृत्यू झाला. संरक्षण दलांचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी याविषयी माहिती दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com