काश्मीरमध्ये चकमकीत हिज्बुलचे 8 दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
रविवार, 1 एप्रिल 2018

अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असून, एकाला जिवंत पकडण्यात आले आहे. तर, शोपियाँमध्ये हिज्बुलच्या कमांडरसह सात दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. या चकमकीत चार जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. प्रमुख दहा दहशतवाद्यांमध्ये हिज्बुलच्या कमांडरचा समावेश होता. 

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील शोपियाँ व अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 8 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर, एक दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले आहे.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियाँ जिल्ह्यातील द्रागड आणि अनंतनाग येथे शनिवारी रात्री दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत आठ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. शोपियाँत सात आणि अनंतनागमध्ये ठार मारण्यात आलेले हे दहशतवादी हिज्बुल मुजाहिदीन या संघटनेचे आहेत. पोलिस, लष्करी जवान आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तरित्या ही मोहिम राबविली.

अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असून, एकाला जिवंत पकडण्यात आले आहे. तर, शोपियाँमध्ये हिज्बुलच्या कमांडरसह सात दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. या चकमकीत चार जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. प्रमुख दहा दहशतवाद्यांमध्ये हिज्बुलच्या कमांडरचा समावेश होता. 

Web Title: jammu-kashmir-shopian-anantnag-encounter-many-millitants-killed