पूलवामा, कंगन वगळता खोऱ्यातील जीवन पूर्वपदावर

वृत्तसंस्था
शनिवार, 7 एप्रिल 2018

श्रीनगर : दक्षिण काश्‍मीरमध्ये शोपियॉं, पूलवामा आणि मध्य काश्‍मीरचा कंगन भाग वगळता उर्वरित काश्‍मीरमध्ये शनिवारी जनजीवन पूर्वपदावर आले. फुटीरवाद्यांचे आंदोलन आणि काश्‍मीर आर्थिक आघाडी (केईए) यांनी पुकारलेल्या संपामुळे शुक्रवारी जनजीवन विस्कळित झाले होते.

पूलवामात काल रात्री सुरक्षा दलाच्या कारवाईत हिज्बुलचा दहशतवादी मारला गेल्याने हिंसाचाराच्या शक्‍यतेने प्रशासनाने पूलवामा येथे जमावबंदी आदेश लागू केला आहे. दुसरीकडे गंदरबल जिल्ह्यातील कनगन येथेही प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. या ठिकाणी काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या कारवाईत एका युवकाचा मृत्यू झाल्याने तणाव निर्माण झाला आहे. यादरम्यान पोलिसांनी ट्विटरवर काश्‍मीर खोऱ्यात शांततेचे आवाहन केले आहे. पूलवामाचा काही भाग आणि कंगन येथे प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याने तेथील नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीची जाणीव असल्याचे पोलिस प्रवक्‍त्याने आवाहनात नमूद केले. हे प्रतिबंध तात्पुरते असून मदतीसाठी 100 वर डायल करण्याचे आवाहन केले. शहर ए खास आणि जुन्या शहरासह श्रीनगरमध्ये आज दुकाने आणि व्यापारी संकुल खुले झाले. श्रीनगरमध्ये काल रात्री कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते. परंतु शहरातील आज बहुतांशी शाळा सुरू झाल्या, मात्र शैक्षणिक संस्था, कॉलेज मात्र बंदच होती.

Web Title: jammu kashmir situation