संयुक्त कारवाईत TRF संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक

ही घटना बारामुल्ला जिल्ह्याच्या जेहानपोरा येथे घडली आहे.
Terrorist
TerroristSakal

जम्मू काश्मीर: सुरक्षा दल आणि बारामुल्ला पोलिस यांच्या संयुक्त कारवाईत TRF या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केल्याची घटना घडली. ही घटना बारामुल्ला जिल्ह्याच्या जेहानपोरा येथे घडली आहे. या कारवाईमध्ये त्यांच्याकडून AK-47 चे ४० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. (Jammu Kashmir Terrorist Attack Updates)

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती वाढतंच चालल्या असून जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान जवळपास २४ दहशतवाद्यांच्या खात्मा करण्यात पोलिसांना आणि सुरक्षा दलाला यश आलं आहे. त्या तुलनेत गेल्या वर्षी याच काळात फक्त ८ दहशतवादी मारले गेले होते. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे.

Terrorist
जागतिक पर्यटनात सिंधुदुर्गची मोहोर; टाॅप 30 पर्यटन स्थळांत समावेश

दरम्यान यावर्षी दहशतवाद्यांच्या पोलिसांवरील आणि सुरक्षा दलावरील हल्ल्याचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे. त्यामुळेच या वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यात सुरक्षा दलाचे पाच जवान शहीद झाले आहेत. परंतु त्यादरम्यान एकही सामान्य नागरिक मारला गेला नसल्याची माहीती आकडेवारीतून समोर आलीये.

या कारवाईत कोणीही जखमी झालं नसल्याची माहीती समोर आलीये. तसेच या दहशतवादी कारवायांना लगाम लावण्यासाठी सुरक्षा दल आणि पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com