माथेफिरूंना "पत्थर का जवाब पत्थर'से देऊ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

आदिवासी तरुणांचा निर्धार; काश्‍मीरमध्ये जाण्याचीही तयारी

झाबुआ,: जम्मू- काश्‍मीरमधील शांतता आणि सुव्यवस्थेसमोरील सर्वांत मोठे आव्हान बनलेल्या माथेफिरू तरुणांच्या दगडफेकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत चालली आहे. स्थानिक तरुणांच्या कडव्या विरोधामुळे निमलष्करी दलाचे मोठे नुकसान होताना दिसते. आता या माथेफिरूंना टक्कर देण्यासाठी आदिवासी तरुण पुढे आले आहेत. गोफण चालविण्यात तरबेज असलेल्या या तरुणांनी निमलष्करी दलाच्या जवानांना मदत करण्याची तयारी दर्शविली आहे.

मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील आदिवासी तरुण गोफण चालविण्यात विशेष तरबेज समजले जातात. हेच कौशल्य त्यांनी लष्करी जवानांच्या मदतीसाठी वापरायची तयारी दर्शविली आहे. स्थानिक आदिवासी तरुणांच्या गोफण बटालियन स्थापन करून त्या काश्‍मीरमध्ये तैनात केल्या जाव्यात. लष्करी जवानांवर दगडफेक करणाऱ्या माथेफिरूंना हे चोख उत्तर असेल असे प्रेमसिंह या लखपूर खेड्यातील तरुणाने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे कॉंग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी अशा प्रकारचे पथक स्थापण्यास हिरवा कंदील दर्शविला आहे. भविष्यामध्ये अशी पथके प्रभावी ठरू शकतात असे कॉंग्रेसचे माजी आमदार झेवियर मेधा यांनी सांगितले. निमलष्करी दलाच्या जवानांना आंदोलकांवर गोळीबार करणे शक्‍य नसते, त्यामुळे गोफणीनेच प्रत्युत्तर दिले जावे असे त्यांनी नमूद केले.

विरोधाचा सूर
दरम्यान, काही अभ्यासक आणि विचारवंतांनी मात्र या पथकांच्या स्थापनेस विरोध केला आहे. पाकिस्तानच्या चुकीच्या प्रचारामुळे काश्‍मिरी तरुण भरकटला आहे. आदिवासी तरुणांनी मात्र शिक्षणाकडे लक्ष द्यावे, असे कॉंग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कांतिलाल भुरिया यांचे पुत्र विक्रांत भुरिया यांनी म्हटले आहे. स्थानिक इतिहासकार के. के. त्रिवेदी यांनी दगडफेक करणाऱ्या तरुणांना गोफणीच्या माध्यमातून सडेतोड उत्तर देता येईल, असे नमूद केले. तुम्ही साध्या हाताने ज्या वेगात दगड फेकता, त्याच्या दुप्पट वेगाने गोफणीतून दगड सुटत असतो, असे त्यांनी सांगितले.

Web Title: jammu-kashmir youth and Tribal youth