चार युद्धांनंतरही व्याप्त काश्‍मीर पाकिस्तानकडेच: अब्दुल्ला

चार युद्धांनंतरही व्याप्त काश्‍मीर पाकिस्तानकडेच: अब्दुल्ला

जम्मू : "पाकिस्तानबरोबर चार युद्धे झाली तरी पाकव्याप्त काश्‍मीर अजूनही त्यांच्याकडेच आहे आणि मी जे बोललो त्यात काही चूक नाही,'' असे वक्तव्य नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी आज येथे केले.

पक्षाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना ते म्हणाले, ""सत्तर वर्षे झाली तरी अजूनही पाकव्याप्त काश्‍मीर पाकिस्तानच्याच ताब्यात आहे. पाकव्याप्त काश्‍मीरबाबतच्या माझ्या आधीच्या विधानांमुळे काही जण नाराज झाले आहेत; पण मी जे बोललो त्यात काय चूक आहे. केंद्राला पाकव्याप्त काश्‍मीर ताब्यात घ्यायचा असेल, तर त्यांना कोणी रोखले आहे. तुम्हाला शक्‍य असेल, तर जावा आणि ताब्यात घ्या.''
ते म्हणाले, ""काही जणांनी माझ्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना मी न्यायालयात उत्तर देईन. नॅशनल कॉन्फरन्स कधीही "आझादी'च्या बाजूने नव्हते. पाकिस्तानबरोबर जावे, असे आम्ही कधीही म्हटलेलो नाही. आम्ही फक्त स्वायत्ततेची मागणी केली आहे. ती घटनात्मक आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com