जम्मू-काश्मीरमध्ये तिसरी लाट? जम्मू प्रांतात आजपासून रात्रीचा कर्फ्यू | J&K | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

j&k

जम्मू-काश्मीरमध्ये तिसरी लाट? जम्मूत आजपासून रात्रीचा कर्फ्यू

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

Jammu Night Curfew: जम्मू काश्मीरच्या जम्मू प्रांतामध्ये आजपासून रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. यामागे नेमके कारण काय?

कोवीडच्या प्रमाणात वाढ?

जम्मू परिसरात कोविड-19 संसर्गाचे प्रमाण वाढल्यामुळे रात्रीचा कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान रात्रीच्या कर्फ्यू संदर्भातील निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हा अधिकारी अंशुल गर्ग यांनी मंगळवारी सांगितले. गर्ग यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "जम्मूमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढल्याने, डीडीएमए (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) ने 17 नोव्हेंबर (बुधवार) पासून रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीचा कर्फ्यू लागू केला आहे.

.....त्यामुळे जम्मूमध्ये रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय

जम्मू-काश्मीरच्या कोरोनाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर असता हा आकडा 3 लाख 34 हजारांच्या पुढे गेला आहे. त्याचवेळी, कोरोनामुळे आतापर्यंत 4 हजार 453 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे, या पार्श्वभूमीवर 17 नोव्हेंबरपासून जम्मूमध्ये रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

loading image
go to top