
यामध्ये सुमारे डझनभर लोक जखमी झाले असून त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
Jammu Kashmir : महामार्गावर बस उलटून भीषण अपघात; चार ठार, 28 प्रवासी जखमी
जम्मू-काश्मीरमध्ये आज (शनिवार) भीषण रस्ता अपघात (Jammu and Kashmir Road Accident) झाला. या बस अपघातात बिहारमधील (Bihar) चार जणांचा मृत्यू झाला, तर 28 जण जखमी झाले आहेत.
दक्षिण काश्मीरमधील श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर गोरीपोरा-अवंतीपोरजवळ हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी जम्मूहून श्रीनगरच्या दिशेनं एक बस येत होती.
वाटेत गोरीपोरा, अवंतीपोर येथील एका पुलाजवळ चालकाचं बसवरील अचानक नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्यावर उलटली. बस उलटल्यानं एकच गोंधळ उडाला. या अपघातानंतर तिथं उपस्थित लोकांनी तातडीनं मदतकार्य सुरू केलं. त्यांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढलं.
यामध्ये सुमारे डझनभर लोक जखमी झाले असून त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी चार प्रवाशांना मृत घोषित केलं. नसीरुद्दीन अन्सार, इस्लाम अन्सारी, राज करण दास, शिवू दास (रा. बिहार) यांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 28 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 23 जणांना येथील विविध रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे.