
Jamshedji Tata Birth Anniversary : भारतात पहिली कार कोणी खरेदी केली होती? वाचून व्हाल थक्क
Jamshedji Tata Birth Anniversary : इंडियन ऑटोमोबाइल मार्केट सतत बूमवर असतं. जगाचं लक्ष भारतीय बाजारपेठेवर असतं. या क्षेत्रात देशाने मागील ५ वर्षांमध्ये ५६ टक्के ग्रोथ केली आहे. जवळपास कंपन्या रोजच नवे मॉडेल लाँच करत असतात. काहीचे तर तुम्ही नावंही ऐकले नसतील. तुम्हाला माहितीये का देशातल्या पहिल्या गाडीचा मालक कोण होता आणि कधी खरेदी झाली? या मागे अनेक रोमांचक कथा आहेत.
बऱ्याच वेबसाइट आणि मीडिया रिपोर्ट्स दावा करतात की, देशातली पहिली कार खरेदी करणारे जमशेद टाटा होते. पण देशातली पहिली कार मुंबई-पुण्यात नाही तर कोलकत्त्यात विकल्याचे अनेक पुरावे आहेत. शिवाय टाटांच्या आधी एका विदेशी माणसाने ती कार खरेदी केली होती. आणि देशातल्या कार ओनरमध्ये टाटांच्या बरोबरीने अजून तिघांनी अशा एकूण चौघांनी कार्स बूक केल्या होत्या. हे चौघेही पारसी होते.
या दोन कार्स भारतात आल्या होत्या
हा काळ भारत इंग्रजांच्या पारतंत्र्यात होता तेव्हाचा होता. १९०० ची सुरुवातच होणार होती. याकाळात फोर्ड आणि फ्रासिसी कार कंपनी डेडियोनची कार बाजारात आणली होती. डेडियोन ने कलकत्त्याच्या वृत्तपत्रांमध्ये कार विकण्याची जाहिरात दिली होती. ही जाहिरात निघताच देशातले श्रीमंत लोक उत्सुक झाले. सगळेच ही कार खरेदी करण्यासाठी उत्सुक होते. पण खरेदी करणारा कोणी वेगळाच निघाला.
पहिली कार कोणी घेतली याविषयी ठोस असं सांगता येत नाही, पण अनेक संदर्भ तपासल्यावर पहिल्या कारचे मालक क्राँप्टन ग्रीव्जशी जोडलेले फोस्टर नामक व्यक्ती होता. त्याने कोलकत्त्यात कार खरेदी केली होती. ते भारतीय नसून ब्रिटीश होते. त्यामुळे भारतीयांमध्ये पहिली कार कोणी घेतली याचा विचार करताना यांना त्यात मोजता येत नाही.
मग जमशेद टाटा पहिले भारतीय कार मालक होते?
हा काळ १८९८ चा होता. देशातील सगळ्यात विकसीत शहरांपैकी कोलकत्ता होतं पण खरेदी करणारा ग्राहक तिथला नव्हता. कारण कार बूक करणारे चौघेही मुंबईचे होते. त्यापैकी एक जमशेद टाटा होते. चौघांनीपण डेडिऑन बूक केली होती. यानंतर जमशेद टाटा देशातले पहिले कार मालक होते असं म्हटलं जातं. पण याला सिद्ध करेल असा कोणताही पुरावा नाही, पहिली कार कोणाला डिलिव्हर झाली याचा पुरावा नाही.