Loksabha 2019 : मतदान केंद्रात घुसून उमेदवारानेच तोडले 'ईव्हीएम'

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 एप्रिल 2019

आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुटी या गावातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. जनसेना पक्षाचे उमेदवार मधुसूदन गुप्ता यांनी मतदान केंद्रात थेट घुसत ईव्हीएम जमिनीवर आपटले. त्यानंतर मतदान केंद्रात एकच गोंधळ उडाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत या उमेदवाराला अटक केली.

हैदराबाद : आंध्र प्रदेशात आज (गुरुवार) लोकसभा निवडणुकीसह विधानसभा निवडणूक होत असून, एका मतदान केंद्रावर जनसेना पक्षाच्या उमेदवाराने मतदान केंद्रात घुसून ईव्हीएम तोडल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या उमेदवाराला अटक केली आहे.

आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुटी या गावातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. जनसेना पक्षाचे उमेदवार मधुसूदन गुप्ता यांनी मतदान केंद्रात थेट घुसत ईव्हीएम जमिनीवर आपटले. त्यानंतर मतदान केंद्रात एकच गोंधळ उडाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत या उमेदवाराला अटक केली.

या घटनेचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला असून, त्यांनी हे कृत्य कशामुळे केले याचे कारण समजू शकले नाही. माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी हे कृत्य केले आहे. जमिनीवर आपटल्याने ईव्हीएमचे तुकडे झाले. आंध्र प्रदेशात 25 लोकसभा आणि 175 विधानसभा मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे. 

Web Title: JanaSena mla candidate Madhusudhan Gupta smashes an evm at a polling booth in Andhra Pradesh