बाळकृष्णाचा पाळणा हालला; देशभरात जन्माष्टमीचा उत्साह

वृत्तसंस्था
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

देशभरात श्रीकृष्णाच्या विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. मथुरेमध्ये श्रीकृष्णाच्या जन्मभूमीतील मंदिराला विशेष सजावट करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्ताने देशभरात उत्साहात मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मसोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

तसेच राज्यभरात आज दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळणार आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात महापूरामुळे झालेले नुकसान लक्षात घेता आयोजकांनी दहीहंडी उत्सव रद्द केला असून काही आयोजकांनी दहीहंडीमधील रक्कम पूरग्रस्तांना देणार असल्याचे जाहीर केले आहे.

देशभरात श्रीकृष्णाच्या विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. मथुरेमध्ये श्रीकृष्णाच्या जन्मभूमीतील मंदिराला विशेष सजावट करण्यात आली आहे. 

दहीहंडीमुळे मुंबईत शाळांना सुट्टी

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या विभागांमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी शासन आणि शालेय शिक्षण विभागामार्फत शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Janmashtami is being celebrated all over country with full joy