जपान येत्या 5 वर्षांत भारतात 3.2 लाख कोटींची गुंतवणूक करेल - PM मोदी

japan to invest  3.2 lakh crores rupees in next 5 years in india says pm narendra modi rak94
japan to invest 3.2 lakh crores rupees in next 5 years in india says pm narendra modi rak94

जपान पुढील पाच वर्षांत भारतात 5 ट्रिलियन येन किंवा 3.2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संध्याकाळी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीत भाग घेतला. या द्विपक्षीय बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यासह अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

14व्या भारत-जपान शिखर परिषदेत पीएम मोदी म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये खूप जुनी मैत्री आहे, तसेच जपानने येत्या पाच वर्षांत भारतात 42 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवले.

भारत जपान वार्षिक परिषदेत पीएम मोदी म्हणाले की, गेल्या काही वर्षांत भारत आणि जपानमधील आर्थिक भागीदारीत बरीच प्रगती झाली आहे. जपान भारतातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक आहे. पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की सध्या भारत आणि जपान मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरवर एकत्र काम करत आहेत. पुढील 5 वर्षांत जपान भारतात 5 ट्रिलियन येन किंवा 3.2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.

japan to invest  3.2 lakh crores rupees in next 5 years in india says pm narendra modi rak94
भारताची सवलतीत रशियन कच्च्या तेलाची खरेदी; इतर देशांचे काय? वाचा
japan to invest  3.2 lakh crores rupees in next 5 years in india says pm narendra modi rak94
राज्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका? सरकारने जारी केला अलर्ट

युक्रेनबद्दलही चर्चा

युक्रेन संकटाबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता राखण्यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करायला हवेत, असे जपानचे पंतप्रधान म्हणाले. सध्याचे युद्ध संकट संपवण्यासाठी जपान आणि भारत दोघेही एकत्र काम करत राहतील आणि युक्रेनला मदत देत राहतील. असे त्यांनी सांगितले.

japan to invest  3.2 lakh crores rupees in next 5 years in india says pm narendra modi rak94
मुलगा-नातवंडांना जीवंत जाळलं; मिठी मारलेल्या स्थितीत आढळले मृतदेह

शिखर परिषदेनंतर, पंतप्रधानांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की भारताचा मेक इन इंडिया संपूर्ण जगासाठी अमर्याद क्षमता प्रदान करतो आणि जपानी कंपन्या आमच्यासाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून बऱ्याच काळापासून आहेत. पीएम म्हणाले की जपान आणि भारत दोघांनाही सुरक्षित आणि स्थिर ऊर्जा पुरवठ्याचे महत्त्व समजले आहे कारण ते आर्थिक विकासासाठी आणि हवामान बदलाच्या समस्येचा सामना करण्यासाठी खूप महत्वाचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com