केरळमध्ये जपानी महिलेवर बलात्कार

वृत्तसंस्था
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

बलात्कारानंतर जखमी झालेल्या या महिलेस तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालय प्रशासनाने यासंदर्भातील माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्वरित हालचाल करत आरोपीस गजाआड केले...

थिरुअनंतपुरम - केरळ राज्यामधील कोवलम या प्रसिद्ध पर्यटन ठिकाणाजवळ एका 35 वर्षीय जपानी महिलेवर बलात्कार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

तेजा (वय 25) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. मूळचा कर्नाटकमधील असलेल्या तेजाच्या कुटूंबीयांचे कोवलममध्ये एक छोटेसे दुकान आहे. पीडित महिलेने तक्रार नोंदविल्यानंतर तेजाविरोधात भारतीय दंडविधानाच्या 376 व्या (बलात्कारासंदर्भातील) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला कोवलममध्ये गेल्या शुक्रवारी आली होती.

बलात्कारानंतर जखमी झालेल्या या महिलेस तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालय प्रशासनाने यासंदर्भातील माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्वरित हालचाल करत आरोपीस गजाआड केले.

Web Title: japanese tourist raped in kerala