जारकीहोळी बंधूंच्या काँग्रेससमोर चार अटी

जारकीहोळी बंधूंच्या काँग्रेससमोर चार अटी

बंगळूर - राज्यातील काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या गोंधळाचा अहवाल आता दिल्लीला पोचला आहे. हायकमांडने जारकीहोळी बंधूंशी संपर्क साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न चालविला आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या दोन अटी मान्य केल्या असून दोन अटी पूर्ण करण्यास वेळ मागितला असल्याचे समजते.

सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेसचे राज्य प्रभारी के. सी. वेणुगोपाल व उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्याशी त्यांनी चर्चा केली. यावेळी त्यांनी आपल्या चार अटी त्यांच्यासमोर ठेवल्या. अटी मान्य झाल्यात पक्षात राहू, नाहीतर आमचा मार्ग आम्हाला मुक्त असल्याचे त्यांनी सांगितल्याचे समजते.
पहिल्या अटीनुसार डी. के. शिवकुमार यांच्यासह कोणत्याच नेत्याने बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात हस्तक्षेप करू नये.

जिल्ह्यात पक्षाचे व सरकारचे हित जोपासण्याची आपली जबाबदारी आमची असेल, परंतु बेळगाव जिल्ह्याच्या बाबतीत निर्णय घेताना आपल्या शब्दाला प्राधान्य देण्यात यावे, मंत्रिमंडळ विस्तारात वाल्मिकी समाजाच्या आणखी एका नेत्याला मंत्रिपद देण्यात यावे, आपल्या समर्थक आमदारांना चार महामंडळाची अध्यक्षपदे देण्यात यावीत, अशा त्यांनी मागण्या केलेल्या आहेत. काँग्रेस नेत्यांनी जारकीहोळी बंधूंच्या दोन मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र अन्य दोन मागण्यांसाठी वेळ मागितली आहे. मंत्रिमंडळ विस्तार व महामंडळावरील नियुक्तीसंदर्भात धजद नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणे आवश्‍यक असल्याने त्यांनी वेळ मागितला असल्याचे समजते. विदेश प्रवासावर असलेले माजी मुख्यमंत्री सिध्दरमय्या परत आल्यानंतर जारकीहोळी बंधू आपला अंतिम निर्णय घेण्याची शक्‍यता आहे.

धजदचे दोघे भाजपच्या वाटेवर ?
धजदचे दोन आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची दिवसभर चर्चा होती. गुरूमितकलचे आमदार नागनगौड कुदकुरू व देवेंद्र चव्हाण भाजपच्या ऑपरेशन कमळच्या जाळ्यात अडकल्याची चर्चा होती. मात्र त्याला स्पष्ट दुजोरा मिळालेला नाही.

मल्लिकार्जुन खर्गे आपले नेते आहेत. ते गुरू व पित्यासमान आहेत. ते सांगतील ते आम्ही ऐकू. त्यांची भेट घेऊन जरूर चर्चा करू. पक्षातील गोंधळ ते दूर करतील, सरकार पाडण्याचा आमचा उद्देश नाही.
- रमेश जारकीहोळी,
मंत्री

सरकार िस्थर व सुस्थितीत आहे. ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी जारकीहोळी बंधूंशी चर्चा करून पक्षातील गोंधळ दूर करण्याची ग्वाही दिली आहे. सरकार कोसळून आपणास संधी मिळेल, असे भाजप दिवास्वप्न पहात आहे.
- जी. परमेश्‍वर,
उपमुख्यमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com