नोटाबंदीच्या निर्णयाचे जशोदाबेन यांच्याकडून कौतुक

वृत्तसंस्था
सोमवार, 19 डिसेंबर 2016

भ्रष्टाचार आणि काळा पैसा बाहेर आणण्यासाठी हा निर्णय योग्य आहे. मला आशा आहे की केंद्र सरकार देशाचा विकास आणि प्रगतीसाठी काम करत राहील.

कोटा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे त्यांची पत्नी जशोदाबेन यांनी कौतुक केले आहे. 

या निर्णयाबाबत बोलताना जशोदाबेन म्हणाल्या, की भ्रष्टाचार आणि काळा पैसा बाहेर आणण्यासाठी हा निर्णय योग्य आहे. मला आशा आहे की केंद्र सरकार देशाचा विकास आणि प्रगतीसाठी काम करत राहील. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा केंद्राचा निर्णय भ्रष्टाचार आणि काळा पैसा बाहेर आणण्यासाठी उत्तम मार्ग आहे. देशाबाहेर गेलेला काळा पैसा परत आणण्यासही मदत होईल. सरकारने आतापर्यंत केलेले काम उत्तम आहे. भविष्यातही असेच निर्णय घेण्यात येतील.

नोटाबंदीच्या निर्णयावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत असताना जशोदाबेन यांनी हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँका व एटीएमबाहेर नागरिकांच्या रांगा आहेत. 

Web Title: jashodaben happy with demonetisation