बुमराहच्या आजोबांचा मृतदेह सापडला साबरमती नदीत

Jasprit Bumrah
Jasprit Bumrah

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह याचे आजोबा संतोकसिंह बुमराह यांचा मृतदेह साबरमती नदीमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. संतोकसिंह हे जसप्रीतला भेटण्यासाठी घरातून निघाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना गांधी आणि दाधिची पूलादरम्यान त्यांचा मृतदेह आढळून आला. जसप्रीतला भेटण्यासाठी ते शुक्रवारी घरातून निघाले होते. तेव्हापासून ते बेपत्ता होते. कुटुंबीयांकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता. जसप्रीतनेही त्यांच्याशी काही बोलणे झाले नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर वस्त्रपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. 

अखेर आज (रविवार) त्यांचा मृतदेह साबरमती नदीमध्ये आढळून आला आहे. जसप्रीतचा पाच डिसेंबरला वाढदिवस असतो, त्यामुळे त्याला भेटण्यासाठी ते उत्तराखंडला निघाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com