'तीन मूर्ती भवन रिकामं करा'

Jawaharlal Nehru Memorial Fund at Teen Murti Bhavan gets eviction notice from Union government
Jawaharlal Nehru Memorial Fund at Teen Murti Bhavan gets eviction notice from Union government

नवी दिल्ली- जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंड ही संस्था 1967 पासून दिल्लीतल्या तीन मूर्ती भवनमध्ये आहे. या संस्थेला तीन मूर्ती भवनातील जागा रिकामी करण्याची नोटिस केंद्र सरकारने पाठवली आहे. या मालमत्तेवर संस्थेने बेकायदेशीर कब्जा केल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. या जागेतील वास्तव्य बेकायदेशीर असून 24 सप्टेंबरच्या आत जागा रिकामी करावी असे केंद्र सरकराने दिलेल्या नोटिशीत म्हटले आहे.

दरम्यान, जवाहरलाल नेहरू मेमोरिल फंड 1964 मध्ये स्थापन झाला होता. त्याचं कार्यालय जवाहरलाल नेहरूंनी वास्तव्य केलेल्या तीन मूर्ती भवनातील जागेत 1967 मध्ये हलवण्यात आले. या फंडाच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देण्यात येतात, तसेच भाषणांचं तसेच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. याव्यतिरिक्त जवाहरलाल बाल भवन, आनंद भवन आदींचं कार्यही या फंडाच्या माध्यमातून सांभाळण्यात येतं. सोनिया गांधी या फंडाच्या अध्यक्ष असून माजी राज्यसभा खासदार करण सिंह उपाध्यक्ष आहेत.

तीन मूर्ती भवनसह नवी दिल्लीतल्या अनेक इमारती सरकारच्या मालकीच्या असून त्या विविध संस्थांना देण्यात आल्या आहेत. अनेक दशकं या इमारतींमध्ये असलेल्या या संस्थांमधल्या काँग्रेसशी संबंधित असल्याचे स्वाभाविक आहे. यामध्येच जवारहलाल नेहरू मेमोरियल फंड या संस्थेचा समावेश आहे. आता सरकार बदलल्यानंतर 50 वर्षे या जागी असलेली ही संस्था तिथं बेकायदेशीररीत्या तळ ठोकून असल्याचा दावा सरकारनं केला आहे. त्यामुळे अशा जागांचे कायदेशीर निकष काय असावेत, सरकार बदललं की अशा जागांमधल्या संस्थाही बदलू शकतात हे यातून स्पष्ट दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com