रमजानमध्ये जवानांचे हात बांधले नाहीत : राजनाथसिंह

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 मे 2018

''पेट्रोलचे वाढलेले दर आटोक्यात आणण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर आणि डॉलरच्या किंमती वाढल्यामुळे पेट्रोलचे दर वाढले आहेत''.

- राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री

लखनौ : भारतीय लष्कराकडून सुरु असलेल्या दहशतवादविरोधी कारवाया रमजान महिन्यामध्ये थांबविण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आल्या. मात्र, दहशतवाद्यांकडून अद्यापही कारावाया सुरुच आहेत. त्यावर आज (मंगळवार) केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले, की ''जर दहशतवादी हल्ला झाला तर जवानांचे हात बांधले नाहीत'', अशा शब्दांत त्यांनी दहशतवाद्यांना कडक इशारा दिला.

केंद्र सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळाबाबत माहिती देताना लखनौ येथे राजनाथसिंह बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर सीमारेषेवर सुरु असलेल्या दहशतवादी कारवाया थांबविण्याच्या सूचना केंद्र सरकारने भारतीय लष्कराला दिल्या होत्या. केंद्र सरकारच्या सूचनेनंतरही सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला होता.

Army india

त्यानंतर आता यावर बोलताना राजनाथसिंह म्हणाले, ''केंद्र सरकारने दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेले कारवाया थांबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, जर दहशतवादी हल्ला झाला तर जवानांचे हातही काय बांधले नाहीत'', असेही ते म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले, 2010-13 मध्ये 471 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर 2014-17 मध्ये 619 दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय लष्करातील जवानांना यश आले. 

दरम्यान, पेट्रोल दरवाढीबाबत राजनाथसिंह म्हणाले, ''पेट्रोलचे वाढलेले दर आटोक्यात आणण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर आणि डॉलरच्या किंमती वाढल्यामुळे पेट्रोलचे दर वाढले आहेत''.

Web Title: Jawans hands not tied during Ramzan period says Rajnath Singh