"वायर'विरोधातील सुनावणीस स्थगिती

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 मार्च 2018

केंद्रातील भाजप सरकारच्या काळात जय शहा यांच्या कंपनीची उलाढाल प्रचंड वाढली असल्याचा दावा करणारा लेख या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध झाला होता. हा आपल्यावरील चुकीचा आरोप असल्याचे सांगत जय शहा यांनी संबंधित न्यूज पोर्टल आणि पोर्टलच्या पत्रकारांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता

नवी दिल्ली - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांनी "द वायर' या न्यूज पोर्टलविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी 12 एप्रिलपर्यंत स्थगित करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने गुजरातमधील न्यायालयाला दिल्या आहेत.

केंद्रातील भाजप सरकारच्या काळात जय शहा यांच्या कंपनीची उलाढाल प्रचंड वाढली असल्याचा दावा करणारा लेख या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध झाला होता. हा आपल्यावरील चुकीचा आरोप असल्याचे सांगत जय शहा यांनी संबंधित न्यूज पोर्टल आणि पोर्टलच्या पत्रकारांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता.

याबाबतची सुनावणी स्थगित करण्याची पत्रकारांची विनंती गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Web Title: Jay Shah The Wire Gujarat trial court