जयललितांच्या निधनाच्या धक्‍क्‍याने 280 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
रविवार, 11 डिसेंबर 2016

चेन्नई: तमिळनाडूच्या मुख्यमंत्री व अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने मरण पावलेल्यांमध्ये 203 जणांची भर पडली आहे. त्यामुळे हा आकडा आता 280 झाला आहे, असे पक्षातर्फे शनिवारी सांगण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल अण्णा द्रमुकने शोक व्यक्त केला असून, 203 मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

जयललिता यांच्या निधनाचा धक्का बसल्याने चेन्नई, वेल्लोर, तिरुवलूर, तिरुवन्नमलई, कुड्डलूर, कृष्णगिरी, इरोड, तिरुपूर आदी ठिकाणी एकूण 203 नागरिकांनी प्राण त्यागले. त्यांच्या नावांची यादी पक्षाच्या मुख्यालयात आज प्रसिद्ध करण्यात आली. त्यांच्या निधनाबद्दल अण्णा द्रमुकने शोक व्यक्त केला असून, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जयललिता यांच्या निधनानंतर 77 जण मरण पावल्याचे पक्षाने यापूर्वी जाहीर केले होते. त्यात आता 203 जणांची भर पडली असून, मृतांची संख्या 280 झाली आहे.

Web Title: Jayalalitam the shock of the death of 280 deaths