जयललिता यांना हृदयविकाराचा तीव्र झटका

वृत्तसंस्था
रविवार, 4 डिसेंबर 2016

चेन्नई - तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना रविवारी रात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे त्यांची प्रकृती पुन्हा गंभीर झाल्याचे अपोलो हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज्यपाल रात्रीच अपोलो हॉस्पिटलकडे रवाना झाले. काल एम्सच्या एका पथकाने जयललिता यांची वैद्यकीय तपासणी केली.

तपासणीनंतर त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या असून, त्या केव्हाही रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊ शकतात, असे संबंधित पथकाने स्पष्ट केले होते. जयललिता यांच्यावर गेल्या दोन महिन्यांपासून उपचार सुरू होते.

Web Title: jayalalitha heart attack